PrintSource

अंतरीच्या अपुर्‍या आशा

Antarichya Apurya Asha

मा. ग. पातकर

अंतरीच्या अपुर्‍या आशा
आकारून कधी येतिल का?
सांग माझ्या मानसीची
भावफुले फुलतील का?

प्रकाश सरला जीवनाचा
दिव्य किरण तव प्रीतीचा
मार्ग माझ्या जीवनाचा
कधी सख्या उजळेल का?

काय जादू केली नकळे
वेड जिवाला तुझे लागले
भिन्‍न अपुली दोन हृदये
एकरूप कधी होतिल का?