असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ? नदीला पूर आलेला, कशी येऊ कशी येऊ? जटा पिंजून या लाटा विखाळी झेप ही घेती भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती जिवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू? कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे बुडाले गाव ते आता, बुडाले नावही मागे दिले हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ? जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले तुझे सौभाग्य ल्याया हे तुझी होऊन मी आले तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ?