असता समीप दोघे
असता समीप दोघे, हे ओठ मूक व्हावे शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे ! अतृप्त मीलनाचे, विरहातही सुखाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे ! फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती होता क्षणैक दूर वेडी मनात भीती दिनरात चिंतनाचे, अनिवार कौतुकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे ! दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !