असावे घर ते अपुले छान
असावे घर ते अपुले छान पुढे असावा बागबगीचा वेल मंडपी जाईजुईचा आम्रतरूवर मधुमासाचा फुलावा मोहर पानोपान संगमरवरी ती पुष्करणी त्यात असावे गुलाबपाणी पाण्यामधुनी कारंजाची फुटावी सुरेल सुंदर तान फुलासारखे मूल असावे नित्य नांदणे घरी हसावे तीर्थरूपे ओवाळावे आपुले जीवन पंचप्राण