असेच हे कसेबसे कसेतरी जगायचे कुठेतरी.. कधीतरी.. असायचे.. नसायचे. असाच हा गिळायचा गळ्यामधील हुंदका कसेबसे तगायचे धरून धीर पोरका. असाच श्वास तोकडा पुन्हापुन्हा धरायचा असाच जन्म फाटका पुन्हापुन्हा शिवायचा. असेच पेटपेटुनी पुन्हापुन्हा विझायचे हव्याहव्या क्षणासही नकोनको म्हणायचे. असेच निर्मनुष्य मी जिथे तिथे असायचे मनात सूर्य वेचुनी जनात मावळायचे.