असेन मी नसेन मी
असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले तृणांत फूलपाखरू, तसे बसेल गीत हे स्वये मनात जागते, न सूर-ताल मागते अबोल राहुनी स्वत: अबोध सर्व सांगते उन्हे जळात हालती तिथे दिसेल गीत हे कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू? निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे