अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती चंद्र कोवळा पहिलावहिला झाडामागे उभा राहिला जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती फुलून येता फूल बोलले मी मरणावर हृदय तोलले नव्हते नंतर परि निरंतर गंधित झाली माती हात एक तो हळू थरथरला पाठीवर मायेने फिरला देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती