अवचिता परिमळु, झुळुकला अळुमाळू । मी ह्मणु गोपाळु, आला गे माये ॥१॥ चांचरती चांचरती बाहेरी निघालें । ठकचि मी ठेलें काय करूं ॥२॥ मज करा कां उपचारूं अधिक ताप भारूं । सखिये सारंगधरू मज भेटवा कां ॥३॥ तो सांवळा सुंदरू कांसे पीताम्बरू । लावण्य मनोहरू देखियेला ॥।४॥ भरलिया दृष्टि जंव डोळां न्याहाळी । तव कोठें गेला वनमाळी गे माये ॥५॥ बोधोनी ठेलें मन तंव जालें अने आन । सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥६॥ बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा । तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥७॥