अवघाचि संसार सुखाचा
अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥ जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृताचें फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥ बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥