अवेळीच केव्हा दाटला अंधार तिला गळा जड झाले काळे सर एकदा मी तिच्या डोळ्यांत पाहिले हासताना नभ कलून गेलेले पुन्हा मी पाहिले तिला अंगभर तिच्या काचोळीला चांदण्याचा जर आणि माझा मला पडला विसर मिठीत थरके भरातील ज्वार कितिक दिसांनी पुन्हा ती भेटली तिच्या ओटी कुण्या राव्याची साउली तिच्या डोळियांत जरा मी पाहिले काजळात चंद्र बुडून गेलेले !