बाळ जा ! मज बोलवेना ! दाटला आता गळा तू रहा सौख्यात बाळे ! अश्रु ढाळू दे मला मीच कन्यादान केले करुनी मोठा सोहळा सासरी निघता परि तू, ऊर माझा भंगला ना कुणा कळतील माझ्या वेदनेच्या या कळा पूस डोळे ! बंध तुटले येथले सारे अता राहू दे वैराण गेही यापुढे मज एकटा हो सदा सौभाग्यलक्ष्मी ! पुण्य माझे घे तुला