बागेत जाउं नको
बागेत जाउं नको, जाउं नको मम प्रीतीचें घालिन पाणी सांजसकाळी गाइन गाणी नाचवीन मंद श्वसनांनीं ओवाळिन तुजवर जिनगानी जाउं नको, जाउं नको ! मम प्रीतीच्या फुला चिमुकल्या ह्या तेजाच्या दिवट्या इवल्या तूं जाशिल तर विझतिल सगळ्या मम हृदयांतिल फुला एकट्या जाउं नको, जाउं नको ! सर्व सुनें मज तुझ्यावाचुनी करावयाचें काय वांचुनी व्यर्थ जगाच्या पुढे नाचुनी तुझ्याचसाठीं मी फुलमाळी जाउं नको, जाउं नको !