बघा ना छळतो हा
बघा ना छळतो हा, छळतो हा वारा असा? ओढुनी अंचल हा, अंचल हा पळतो असा ! आळ वृथा का या वार्यावर, वार्याहुन मन चंचल, आवर ! कशी आवरु हलता झुलता तव नयनांचा आरसा ! इथेच झाले नील जलावर, स्वर्ग-धरेचे मीलन सुंदर प्रतिबिंबाला बिंब पाहता वेडावुनी मज राजसा ! भावमधूर ही फुले मनोहर, बहरून आली पर्णपाचूवर सहवासाचा सुगंध अपुला परिमळ तो हा गोडसा !