बघुनि त्या भयंकर भूता फोडिली तिनें किंकाळी । या हृदया चरका बसला, कळवले मनहि त्या काळीं । परि बाप तिचा तो कसला चांडाळ पूर्विचा वैरी । तिळभरही द्रवला नाहीं उलट त्या बिचारिस मारी । ती दीन भयाकुल मुद्रा रात्रंदिन दिसते बाई । रडविलें तिनें मज कितिदां दचकतें भिउनि शयनींही ॥