PrintSource

बहरलेले नंदनवन अंगणी

Baharalele Nandanvan

हिराकांत कलगुटकर

आज अचानक दिसले नयनी
बहरलेले नंदनवन अंगणी

सपर्ण तरूवर गाई कोकिळ
ऋतु वसंताची ही चाहूल
नकळत कोठून पावा मंजूळ गुणगुणतो कानी

वसंतराणी थयथय नाचते
सप्त सुरांतून लकेर घुमते
रोमांचाने पुलकित होते अंगअंग ह्या क्षणी

पानोपानी फुलाफुलावर
नवरसगंधाचा हा बहर
अनेक झुंबर आम्रतरूवर लावियले कोणी