बाई माझी करंगळी मोडली
ऐन दुपारी यमुनातीरी, खोडी कुणी काढली बाई माझी करंगळी मोडली जळी वाकुन मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा गुपचूप येऊन पाठीमागून माझी वेणी ओढली समोर ठाके उभा आडवा हातच धरला माझा उजवा मीही चिडले ईरेस पडले, वनमाला तोडली