PrintSource

बाई मी पतंग उडवीत होते

Bai Mi Patang Udavit Hote

ग. दि. माडगूळकर

चढाओढीने चढवीत होते
ग बाई, मी पतंग उडवित होते !

होता झकास सुटला वारा
वर पतंग अकरा-बारा
एकमेकांना अडवित होते
बाई, मी पतंग उडवित होते

काटाकाटीस आला ग रंग
हसू फेसाळ घुसळीत अंग
दैव हारजीत घडवीत होते
बाई, मी पतंग उडवित होते

माझ्या दोर्‍यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
गेला गुंतत गिरवीत गोते
बाई, मी पतंग उडवित होते