बाळा माझ्या नीज ना
जो जो गाई, अंगाई गाते बाळ माझ्या नीज ना ! ज्योत मंदावली पेंगते साउली पानोपानी वारा हलेना बाळा माझ्या नीज ना ! पाऊलचाळा घुंगूरवाळा का नीज नाही राजा तुला? इवल्या पापण्या शिणल्या ना? बाळा माझ्या नीज ना ! डोळे फुलांचे मिटलेत बाई ओठांत दाटून ये जांभई बाळास माझ्या आता निजू द्या काऊचिऊ या सारे उद्या ! बाळा माझ्या नीज ना !