बलसागर तुम्हि वीरशिरोमणि कोठें तरि रमलां । आश्वासन जिस दिलें तिला कां विसरुनियां गेलां ॥ पेरियलें जें प्रीतितरूचें बीज हृदयिं त्याला । अंकुर येउनि सुदृढ तयाचा वृक्ष असे झाला ॥ सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसलां । चित्र असे हृदयांत कोंदतां ठाव न अन्याला ॥ पांडुकुमारा पार्थ नरवरा, राखा वचनाला । निश्चय माझा नढळे जरि हा कंठ कुणीं चिरला ॥