बेचैन हळव्या लाटा
बेचैन हळव्या लाटा शोध घेतात कुणाचा नर्म रेतीत पसारा ह्या निराकार ठश्यांचा सांज शकुनाने भारल्या मौन माडांच्या सावल्या गीत गातात कुणाचे? ठाव घेतात मनाचा शोध घेतात कुणाचा शुभ्र तार्यांचा काफिला, दूर जाताना बोलला सांगता हीच निशेची, हाच प्रारंभ उद्याचा भास सांभाळ धुक्याचा