बेइमान झालो पुरा पुरा, मी देशाचा अपराधी खरा ! भारतमातेचे हे प्यारे, स्वातंत्र्याचे उज्ज्वल तारे बंदिवान मी केले सारे, मज क्षमा करा हो क्षमा करा ! मी परक्यांचा सेवक बनलो, आईला अन् भार जाहलो मीठ खाऊनी हराम झालो, ही खंत जाळिते आज उरा ! हृदय जरी हे पाषाणाचे, नाही पण ते निर्दय साचे भयाण रात्री एकान्तीचे, ते ढाळी आसवांच्या धारा ! हे देवांनो ! गगनामधुनि, लाख चांदण्यांच्या डोळ्यांनी नका नका हो बघू रागानी, तो शाप जरा आवरुनी धरा !