Back
Fitting…

1 page

भाग्य पांगळे भोग भोगते

भाग्य पांगळे भोग भोगते, न्याय आंधळा भाळी
पापपुण्य मग असो कुणाचे दैव दुजाला जाळी

कधी न कळते दैव कुणाचे
काळ सांगतो ज्याचे-त्याचे
वेळ साधुनी दैव वाढते सुख-दु:खाची थाळी

फूल चढे कधी प्रभुचरणावर
रडे कधी ते शवसरणावर
अपंग सगळे, हसे कुणी तर कुणी आसवे ढाळी

दैवाचे हे उलटे फासे
फिरता घर मग फिरती वासे
ना ये सांगून कधी कुणाची येते अवचित पाळी

भाग्य पांगळे भोग भोगते

भाग्य पांगळे भोग भोगते, न्याय आंधळा भाळी
पापपुण्य मग असो कुणाचे दैव दुजाला जाळी

कधी न कळते दैव कुणाचे
काळ सांगतो ज्याचे-त्याचे
वेळ साधुनी दैव वाढते सुख-दु:खाची थाळी

फूल चढे कधी प्रभुचरणावर
रडे कधी ते शवसरणावर
अपंग सगळे, हसे कुणी तर कुणी आसवे ढाळी

दैवाचे हे उलटे फासे
फिरता घर मग फिरती वासे
ना ये सांगून कधी कुणाची येते अवचित पाळी

भाग्य पांगळे भोग भोगते

भाग्य पांगळे भोग भोगते, न्याय आंधळा भाळी
पापपुण्य मग असो कुणाचे दैव दुजाला जाळी

कधी न कळते दैव कुणाचे
काळ सांगतो ज्याचे-त्याचे
वेळ साधुनी दैव वाढते सुख-दु:खाची थाळी

फूल चढे कधी प्रभुचरणावर
रडे कधी ते शवसरणावर
अपंग सगळे, हसे कुणी तर कुणी आसवे ढाळी

दैवाचे हे उलटे फासे
फिरता घर मग फिरती वासे
ना ये सांगून कधी कुणाची येते अवचित पाळी