भाग्यवती मीं त्रिभुवनिं
भाग्यवती मीं त्रिभुवनिं झाले । कुबेर माझा धनी ॥ तुझेच सारे वैभव येथे । मी नावाचा धनी ॥ दो दिवसाचे वैभव खोटे । मोल तयाचे जगास वाटे । तुम्हावाचुनी मातीमोल हे । नकोच असले जिणे । करितील हेवा सारे नवरे । पाहुनि माझे जिणे । भाग्यवती मी तुमची राणी । भाग्यवान मी नवरा म्हणुनी । जोवरि लाभे प्रेमाचे धन । पर्णकुटीही बरी । मानिसी ऐसे वाटे होइल तुझा कुबेर भिकारी ॥