भक्ताचिया काजासाठी
भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी, सोडली मी लाज रे ॥१॥ धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागेपुढे । घाली अंगणात सडे, बांधुनिया माज रे ॥२॥ वेडी गवळीयांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बा रे । खाता भिल्लिणीची बोरे, उच्छिष्ठाची चोज रे ॥३॥ दुर्योधन सदनी गेलो, विदुराच्या गृहा आलो । आवडीने कण्या प्यालो, जोंधळ्याची पेज रे ॥४॥ पुर्णब्रह्म ह्मणती माते, पुर्णब्रह्म मींच त्यांते । ऐंसी याची जाणीव ते, ह्मणे अमृतराय रे ॥५॥