भर तारुण्याचा मळा
Bhar Tarunyacha Mala
ना. धों. महानोर
भर तारुण्याचा मळा, कमळिणी कळा, फुलांचा भार
डोळ्यातून हलका पाऊस भिजला, मोरणिचा लयभार
बहरलं केवड्याचं रान, दरवळे पान पान पान
जाळीमंदी लपल्या ग पोरी, गोरी त्या छान छान छान
अलवार फुलांची होरी, राजस गोरी, गहिना गौर
ह्या कळ्याफुलांच्या देठांमधले रंग सये गर्भार
देहाला डसले जहर, तयाची लहर, पेटते ओठी
हा बहर, कहर अंगात विकारी रात पांखरासाठी
पौषात हिवाळी रात, गळ्यामंदी हात, गच्च गुंफावे
मोकळ्या खुळ्या देहाच्या विभवावरी जाणते रावे
भर तारुण्याचा मळा, कमळिणी कळा, गगन घनदाट
डोळ्यांत लालसर, गडद गर्दशी स्पर्शजांभळी रात