भरलं आभाळ पावसाळी
Bharala Aabhal Pavasali
ना. धों. महानोर
भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
( पिवळ्या पानांवरी मोतियांच्या सरी
माझी काचोळी दाट गाठ बांधेना )
निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी
वाट पाहिली डोळा चळ थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना
श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी
हिर्व्या मोराची थुई थुई थांबेना
निळ्या मोराची थुई थुई थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ
बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना