भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावित सतत रूप आगळे वसंत वनात जनात हासे सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे गातात संगीत पृथ्वीचे भाट चैत्रवैशाखाचा ऐसा हा थाट ज्येष्ठ-आषाढांत मेघांची दाटी कडाडे चपला होतसे वृष्टी घालाया सृष्टीला मंगल स्नान पूर अमृताचा सांडे वरून गगनी नर्तन कृष्ण मेघांचे भूतली मयूर उत्तान नाचे श्रावणी पाऊस हास्याचा पडे श्रीकृष्णजन्माची दंगल उडे बांधिती वृक्षांना रम्य हिंदोळे कामिनी धरणी वैभवी लोळे