PrintSource

भातुकली उधळली अचानक

Bhatukali Udhalli Achanak

ग. दि. माडगूळकर

भातुकली उधळली अचानक
रुसे बाहुला, खिन्‍न बाहुली
भातुकली उधळली !

पाटालागी पाट लावुनी
चूलबोळकी त्यात मांडुनी
खेळ खेळता एक दिलानी
अर्ध्यावरती दृष्ट लागली !

पातक देवा ! गतजन्मीचे
या जन्मी का भोगायाचे
दूषण लागुनी अभिसाराचे
सुवासिनीची गणिका ठरली !

संसाराच्या राज्यामधली
अखेर राणी दासी ठरली
गीत भैरवी गाऊ लागली
पूर्वरात्रीला मैफल उठली !