भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातिल जणु अंगी राघवशेला स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे