भेटीची आवडी उताविळ मन
भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥ आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येउनी गोपाळा क्षेम देई ॥२॥ नेत्र उन्मिळत राहिले तटस्थी । गंगा अश्रुपाती वाहविली ॥३॥ तुका ह्मणे तुह्मी करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥४॥