बिना कपाशीनं उले
बिना कपाशीनं उले त्याले बोंड म्हनू नही हरिनामाईना बोले त्याले तोंड म्हनू नही नही वार्यानं हाललं त्याले पान म्हनू नही नही ऐके हरिनाम त्याले कान म्हनू नही पाटा-येहरीवाचून त्याले मया म्हनू नही नही देवाचं दर्सन त्याले डोया म्हनू नही निजवते भुक्यापोटी तिले रात म्हनू नही आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही जीले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही