बोलणे नको अता
बोलणे नको अता असेच मूक राहूया सांजरंगी रंगले क्षितिज मात्र पाहूया अबोध काहीसे असे मनास जो न वाटले फुलाफुलांत येथल्या सुवास तेच दाटले धुंद गंध तो जरा उरी भरून घेऊया गूज अंतरातले तरल फुलपाखरू श्वास ज्या न साहवे, स्पर्श त्या कसा करू? चित्र रम्य हालते नित्य नयनी ठेवूया मिळून दूर जाहल्या क्षणैक दोन सावल्या गहन या तमी कुणी लक्ष ज्योती लावल्या तो प्रकाश आगळा जन्म जन्म लेवूया