बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥२॥ बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥ तुका ह्मणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥