PrintSource

बोलून प्रेमबोल तू लाविलास

Bolun Prembol Tu Lavilas

गंगाधर महाम्‍बरे

बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद
लावून छंद वेडा केलेस विश्व धुंद

धुंदित त्या क्षणांच्या युग एक हे बुडाले
घरटे करोनी चिमणे मनपाखरू उडाले
वार्‍यावरी वरात, पथ हा तया अरुंद

प्रीतीत रंगलेली विरली उषा प्रभाती
छंदात हरवल्या त्या मधुपुनव चांदराती
निशिगंध मात्र देई मनभाबडा सुगंध