बुडतां आवरीं मज । भवाचे सागरीं ॥१॥ नको मानुं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥२॥ आहे तें सांभाळी । तुझी कैसी ब्रीदावळी ॥३॥ तुका ह्मणे दोषी । मी तो पातकांची राशी ॥४॥