चाळ माझ्या पायांत, पाय माझे तालात नाचते मी तोर्यात मोरावाणी काय तुझ्या मनात सांग माझ्या कानांत गोड गोड गुपित तुझ्या मनी रे डौल आला खांद्याला बाक आला बांध्याला हातांची झाली अशी नागफणी रुसते मी मनात हसते गालांत झुलते मी सूरांत रातराणी रे नाजूक ओठांखाली छोटीशी बाई करांगुली लाजते मी मनात, कशी सांगू जनात नांदू दोघं जशी राजा-राणी रे रूप माझं चंद्राचं पहा लाख मोलाचं चंद्राची कोर मी तारांगणी लुकलुकत्या तार्यांत डुलते तोर्यात शोभते शुक्राची मी चांदणी रे