चक्रवाक पक्षी वियोगें बाहाती । झालें मजप्रती तैसें आतां ॥१॥ चुकलिया माय बाळकें रडती । झालें मजप्रती तैसें आतां ॥२॥ वत्स न देखतां गाई हुंबरती । झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥ जीवनावेगळे मत्स्य तळमळती । झालें मजप्रती तैसें आतां ॥४॥ नामा ह्मणे मज ऐसें वाटे चित्तीं । करितसें खंती फार तुझी ॥५॥