चल सर्जा चल राजा
चल सर्जा चल राजा, बिगी बिगी बिगी जायाचं बिन मोलाचं बिन तोलाचं सौंगडी शेतकर्याचं माथ्यावरती दिवसाचा ये डोळा, चल सर्जा होय भुकेला शंभू हा हाय भोळा, चल राजा भाकर कांदा झुणका रांधा, पोट भरे रायाचं उडेल फेटा पळसाच्या रंगाचा, चल सर्जा खण जरतारी आणिन मी भिंगाचा, चल राजा तुजवर माळा घुंगुरवाळा, लेणं सौभाग्याचं येईल आता चांदोबा आभाळी, चल सर्जा होइल वेडी पारंब्यांची जाळी, चल राजा कलत्या माना डुलक्या घ्या ना, टकमक नच पाह्याचं