चांद तू नभातला नि
चांद तू नभातला नि बावळा चकोर मी गुलाम होउनी तुझा उभा तुझ्या समोर मी तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी तनामनात माझिया तुझी सदैव मोहिनी उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू तू प्रेमला तू श्यामला तू कोमला तू दामिनी वेंधळा जरी, तरी तुझाच चित्तचोर मी पहाट तू ग मल्मली कोवळ्या उन्हातली मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली तू रोहिणी तू मानिनी सखे तू चैत्र यामिनी मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी