चांदण्यात ह्या धरणी
चांदण्यात ह्या धरणी हसते, चंद्र हसे गगनी चांदणे फुलले माझ्या मनी आभाळाची धरणीवरती अशीच आहे अखंड प्रीती त्या प्रीतीच्या शीतलतेने सुखावली रजनी ओली वाळू झाली रुपेरी नाचनाचती सागरलहरी माडामधुनी लबाड वारा आळवितो गाणी या चंद्राच्या अनंत लीला उपमा नाही अवखळतेला अर्थासाठी आतुरली ही शब्दमयी वाणी