PrintSource

चांदोमामा चांदोमामा

Chandomama

मंगेश पाडगांवकर

चांदोमामा, चांदोमामा
भागलास काय?
घरचा अभ्यास केलास काय?

चांदोमामा, चांदोमामा
लपलास काय?
पुस्तक हरवून बसलास काय?

चांदोमामा, चांदोमामा
रुसलास काय?
गणितात भोपळा घेतलास काय?