चंद्र आहे साक्षीला
पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला ! चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला ! स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो सूर हा ताल हा जीव वेडा डोलतो रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला ! लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा अंग का चोरीसी दो जिवांच्या संगमा आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला !