चंद्रमुखी तू मेघसावळी सावली आभाळाची हिरव्या रानी जशी दरवळे पाकळी हिरव्या चाफ्याची ग नेत्र तुझे रानात पाहुनी हरिणे बघ पडतात फशी कवळी काया अशी थरारे पहिली पाऊसधार जशी ग शब्दांच्या तळी सूर मधाचा साळुंकीची जात जशी ओठावरचा तीळ लाजरा मदनावरची मात जशी ग भाग्यवंत तो पुरुष ज्याला तू आपणहुन आलिंगीशी नागिणीच्या विळख्यात तुझ्या या सुख सोन्याचे बावनकशी ग