चंद्राविना ठरावी जशी पौर्णिमा निरर्थ आयुष्यही तसे ग प्रेमाशिवाय व्यर्थ ! झेपावतात लाटा चंद्रास भेटण्यासी विजनी वसंत येता आह्लाद कोकिळेसी मधुमालती जशी ग गंधाविना निरर्थ आयुष्यही तसे ग प्रेमाशिवाय व्यर्थ ! डुलुनि खुणाविते ती कलिका कुणास सांगा भ्रमरांचिया थव्यांनी फुलतात रम्य बागा स्वातिजलाविना रे शिंपा जसा निरर्थ आयुष्यही तसे हे प्रेमाशिवाय व्यर्थ !