PrintSource

छेडियल्या तारा

Chediyalya Tara

शान्‍ता शेळके

छेडियल्या तारा
ते गीत येईना जुळून !
फुलते ना फूल तोच
जाय पाकळी गळून !

आकारून येत काहि
विरते निमिषात तेहि
स्वप्‍नचित्र पुसुनि जाय
रंग रंग ओघळून !

क्षितिजाच्या पार दूर
मृगजळास येई पूर
लसलसते अंकूर हे
येथ चालले जळून !