छेडून गेले मधुर स्वर
छेडून गेले मधुर स्वर विमल आज उपवनी कोण पाहिले प्राणांचे ऋतुगंध उमलुनी जीवन संगीत त्यास वाहिले मदिर रात्र ही, अधीर चंद्रिका गात्रामधुनी हसे राधिका डोळे टिपले पानांचेही पहाट होता दहिवर ओले कंठामधुनी सूर झुलावा सुरांत तुझिया जीव फुलावा मीलन होता मधुभावाचे ह्या जन्माचे सार्थक झाले