चिमण्या पाखरांचे चिमणे ग
चिमण्या पाखरांचे चिमणे ग घरकुल चिमणे पंख मऊ, चिमणी ग किलबिल ! कालच्या वादळाची नाही ग आठवण उद्याची नाही चिंता, नाही ग साठवण हालत्या फांदीवरी डोलती वंशवेल ! आभाळ वर निळे, विशाल खाली जग झाडांच्या मनोर्यांत चिमणे लोभ-राग प्रहार करू जाता वाराही थरारेल ! पाखर आभाळाची, आधार धरणीचा देखावा मनोहर देवाच्या करणीचा वेगाने धावताना काळ उडुनी जाईल !