चिंब पावसानं रान झालं
चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदणं गोंदणी. झाकू नको कमळनबाई एकान्ताच्या कोनी रूपखनी अंगावरली सखे, लावण्याची खाणी. राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी. तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी सांगता ना येई काही साजणा बोलांनी