चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला भरजरी फाडुन शेला ! बघून तिचा तो भाव अलौकिक मनी कृष्णाच्या दाटे कौतुक कर पाठीवर पडला आपसुख प्रसन्न माधव झाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला ! म्हणे खरी तू माझी भगिनी भाऊ तुझा मी दृपदनंदिनी साद घालिता येईन धावुनी प्रसंग जर का पडला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला ! प्रसंग कैसा येईल मजवर पाठीस असशी तू परमेश्वर बोले कृष्णा दाटून गहिवर पूर लोचना आला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला !