दारीच्या देवळींत जळो पणति सारी रात प्रगटले न अजून कांत, अंधकार अंतरात रात्रंदिन वाट बघत, घालुनी पळी कडींत येइना अजून मूर्त माघारी मंदिरांत रांगोळी अंगणात अश्रुबिंदु घालतात गाल-ओठ भिजुन जात ओघळत्या काजळांत वृंदावनि सांजवात नि:श्वासे विझुन जात तुळशीच्या प्रदक्षिणांत चर्र होत काळजांत नाथांची झाली साथ फक्त सात पावलांत आज ऊर-तारु फुटत विरहाच्या वादळांत कुंकवाच्या कोयरीत, रोज थबकतोहि हात वैरी जे जे न चिंती ते ते ये मनात